एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या 18, 748 वर
जिल्हा आरोग्य अधिकारी बी.टी. जमादार यांची माहिती
6379व्यक्ती सिव्हिल रुग्णालयात घेत आहेत उपचार
आज 14, एकूण मृत 531, एकूण बरे 11,838
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात बुधवारी 415 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून यापैकी 275 पुरुष, 140 स्त्रियांचा समावेश आहे. आज 14 तर आतापर्यंत 531 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 18 हजार 748 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 6 हजार 379 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.टी जमादार यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोनाबाधितांचा अहवाल दिला आहे. आज 3162 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 2747अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 415 पॉझिटिव्ह आढळल्या आहे . 18 हजार 748 रुग्णांपैकी 11 हजार 518 पुरुष, 7 हजार 230 स्त्री आहेत. आतापर्यंत 531 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 11 हजार 838 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढीलप्रमाणे :
अक्कलकोट 814
मंगळवेढा 885
बार्शी 3592
माढा 1845
माळशिरस 2637
मोहोळ 825
उत्तर सोलापूर 625
करमाळा 1350
सांगोला 1146
पंढरपूर 3866
दक्षिण सोलापूर 1163
एकूण 18, 748
होम क्वांरटाईन – 5892
एकूण तपासणी व्यक्ती- 146354
प्राप्त अहवाल- 146251
प्रलंबित अहवाल- 103
एकूण निगेटिव्ह – 127503
कोरोनाबाधितांची संख्या- 18, 848
रुग्णालयात दाखल – 6379
आतापर्यंत बरे – 11,838
मृत – 531