प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात आज सोमवारी 57 नवे कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून एकाच दिवशी 123 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. 57 पैकी 32 पुरुष, 25 स्त्रियांचा समावेश आहे. आज 4 तर आतापर्यंत 1089 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 36 हजार 979कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 1 हजार 034 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 1123 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 1066 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 57 पॉझिटिव्ह आढळल्या आहे. आतापर्यंत 1089 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 34 हजार 856 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट – 1188
मंगळवेढा- 1680
बार्शी – 6462
माढा- 3894
माळशिरस – 6796
मोहोळ- 1801
उत्तर सोलापूर – 803
करमाळा- 2334
सांगोला – 2872
पंढरपूर 7606
दक्षिण सोलापूर – 1543
एकूण – 36, 979
होम क्वांरटाईन – 11665
एकूण तपासणी व्यक्ती- 359790
प्राप्त अहवाल- 358753
प्रलंबित अहवाल- 37
एकूण निगेटिव्ह – 321775
कोरोनाबाधितांची संख्या- 36,979
रुग्णालयात दाखल – 1034
आतापर्यंत बरे – 34,856
मृत – 1089