जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढले सुधारित आदेश
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत सर्वानुमते शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिह्यातील ग्रामीण भाग अद्याप स्तर तीनवर आहे. त्यामुळे सात जूनला लागू केलेल्या निर्बंधांना उद्यापासून (सोमवार) पुढील आदेश होईपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी रविवारी काढले आहेत.
महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना डेल्टाप्लसचे रुग्ण आढळले व तिसरी लाट येण्याची शक्मयता वर्तविण्यात आली. राज्य सरकारने राज्यातील सर्व शहर व जिह्याचा समावेश लेवल तीनमध्ये करून लेवल तीनमध्ये निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिह्यातील ग्रामीण भागात अजून, रुग्ण संख्या कमी होताना दिसत नाही.
या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक 9 जुलै रोजी पार पडली. यामध्ये 4 जून ते 25 जून या सप्ताहातील सरासरी पॉझिटिव्हिटी रेट 5.33 टक्के असून ऑक्सिजन, बेडची टक्केवारी 9.15 टक्के आहे. त्यामुळे निर्देशाप्रमाणे सोलापूर जिल्हास्तर तीनमध्ये आहे. त्यामुळे 7 जून रोजी लागू केलेल्या आदेशास मुदतवाढ देण्यात आली आहे.
सोलापूर महानगरपालिका प्रशासकीय क्षेत्र वगळून सोलापूर जिल्हा ग्रामीण क्षेत्र वेगळा प्रशासकीय घटक मानण्यात येत आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करावी, असे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी आदेशात नमूद केले आहे.