एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या 33, 101 वर
सोलापूर / तरुण भारत संवाद प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात आज शनिवारी 135 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून यापैकी 104 पुरुष, 31 स्त्रियांचा समावेश आहे. आज 4 तर आतापर्यंत 981 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 33 हजार 101 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 1 हजार 887 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 1662 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 1527 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 135 पॉझिटिव्ह आढळल्या आहे. आतापर्यंत 981 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 30 हजार 233 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट – 1148
मंगळवेढा- 1473
बार्शी – 6052
माढा- 3458
माळशिरस – 2083
मोहोळ- 1659
उत्तर सोलापूर – 746
करमाळा- 2083
सांगोला – 2541
पंढरपूर 6655
दक्षिण सोलापूर – 1467
एकूण – 33,101
होम क्वांरटाईन – 22727
एकूण तपासणी व्यक्ती- 281142
प्राप्त अहवाल- 281103
प्रलंबित अहवाल- 39
एकूण निगेटिव्ह – 248003
कोरोनाबाधितांची संख्या- 33,101
रुग्णालयात दाखल – 1887
आतापर्यंत बरे – 30, 233
मृत – 981