सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात आज तब्बल 434 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले, तर उपचार घेऊन बरे झाल्याने तब्बल 314 रुग्णांना घरी सोडले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी शुक्रवारी दिली.
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात शुक्रवारी 2917 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 434 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 2483 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 434 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 257 पुरुष आणि 177 स्त्रियांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 23103 झाली आहे.
-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 173808
-ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 23103
-प्राप्त तपासणी अहवाल : 173670
-प्रलंबित तपासणी अहवाल : 139
-निगेटिव्ह अहवाल : 150566
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 633
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 7227
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या : 15244