जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांची माहिती
सोलापुर /प्रतिनिधी
सोलापुर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात सोमवारी उशिरा मिळालेल्या रिपोर्टनुसार 285 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले, तर 7 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उपचार घेऊन बरे झाल्याने तब्बल 228 रुग्णांना घरी सोडले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी आज मंगळवारी दिली.
सोलापुर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात 2449 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 285 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 2164 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 385 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 187 पुरुष आणि 98 स्त्रियांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 6187 झाली आहे.
एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 48855
-ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 6187
-प्राप्त तपासणी अहवाल : 48690
-प्रलंबित तपासणी अहवाल : 165
-निगेटिव्ह अहवाल : 42504
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 179
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 2447
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या : 3561