सोलापुर / प्रतिनिधी
सोलापुर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात शुक्रवारी उशिरा मिळालेल्या रिपोर्टनुसार 311 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले, तर 9 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उपचार घेऊन बरे झाल्याने तब्बल 98 रुग्णांना घरी सोडले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी आज शनिवारी दिली.
सोलापुर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात 3126 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 311 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 2815 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 311 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 177 पुरुष आणि 134 स्त्रियांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 5186 झाली आहे.
एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 39550
-ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 5186
-प्राप्त तपासणी अहवाल : 39398
-प्रलंबित तपासणी अहवाल : 152
-निगेटिव्ह अहवाल : 34213
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 153
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 1990
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या : 3043