तरुण भारत संवाद सोलापूर , प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात गुरुवारी थोडा दिलासा मिळाला आहे. नव्याने 1 कोरोना बाधीत रुग्णांची भर पडली तर बाधित रुग्णामध्ये 1 स्त्रिचा समावेश आहे. आतापर्यंत 11 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे . आज 3 तर आतापर्यंत 69 रुग्ण बरे होऊन घरी गेली आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 149 कोरोबधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 69 रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी गुरुवारी दिली.
पॉझिटिव्ह रुग्णामध्ये मुजावर गल्ली अक्कलकोट याठिकाणी एक महिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळली आहे. आज 12 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 1 पॉझिटीव्ह तर 11 अहवाल निगेटिव्ह आले. अद्याप 68 अहवाल प्रलंबित आहेत. 149 रुग्णांपैकी 91 पुरुष 58 स्त्री आहेत. तालुक्यात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 69 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट – 22
बार्शी – 22
माढा- 7
माळशिरस – 4
मोहोळ- 5
उत्तर सोलापूर – 11
सांगोला – 3
पंढरपूर 7
दक्षिण सोलापूर – 68
एकूण – 149
होम क्वांरटाईन – 2451
आजपर्यंत तपासणी केलेली व्यक्ती- 2234
प्राप्त अहवाल- 2166
प्रलंबित अहवाल- 68
एकूण निगेटिव्ह – 2018
कोरोनाबाधितांची संख्या- 149
रुग्णालयात दाखल – 69
आतापर्यंत बरे – 69
मृत – 11