सोलापूर , प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सोमवारी 171 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये 105 पुरुष, 66 स्त्रियांचा समावेश आहे. आज 1 आतापर्यंत 45 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 1994 कोरोबधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 1345 रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.टी जमादार यांनी सोमवारी दिली.
आजचे कोरोनाबाधित रुग्ण मोहोळ , उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, पंढरपूर, बार्शी, सांगोला, , माढा, माळशिरस तालुक्यातील आहेत.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 1495 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 1324 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 171 पॉझिटिव्ह आढळल्या आहे . 1994 रुग्णांपैकी 1241 पुरुष 753 स्त्री आहेत. तालुक्यात तर आतापर्यंत 45 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 1345 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
—-//////
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाण
अक्कलकोट – 359
मंगळवेढा- 52
बार्शी – 489
माढा- 75
माळशिरस – 89
मोहोळ- 149
उत्तर सोलापूर – 171
करमाळा- 25
सांगोला – 13
पंढरपूर 149
दक्षिण सोलापूर – 423
एकूण – 1994
———/–
होम क्वांरटाईन – 2618
आजपर्यंत तपासणी केलेली व्यक्ती- 14610
प्राप्त अहवाल- 14514
प्रलंबित अहवाल- 96
एकूण निगेटिव्ह – 12521
कोरोनाबाधितांची संख्या- 1994
रुग्णालयात दाखल – 1345
आतापर्यंत बरे – 604
मृत – 45