सोलापूर / प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात मंगळवारी 207 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले, तर 7 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उपचार घेऊन बरे झाल्याने तब्बल 222 रुग्णांना घरी सोडले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी मंगळवारी दिली.
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात 1085 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 207 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 878 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 207 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 118 पुरुष आणि 89 स्त्रियांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4301झाली आहे.
-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 31140
-ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 4301
-प्राप्त तपासणी अहवाल : 31020
-प्रलंबित तपासणी अहवाल : 120
-निगेटिव्ह अहवाल : 26720
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 127
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 1603
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या : 2571