सोलापूर / प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज मंगळवारी 244 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. तर 9 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उपचार घेऊन बरे झाल्याने तब्बल 233 रुग्णांना घरी सोडले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रात 1798 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 244 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 1554 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 244 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 152 पुरुष आणि 92 स्त्रियांचा समावेश आहे. जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 8122 झाली आहे.
-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 65195
-ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 8122
-प्राप्त तपासणी अहवाल : 65058
-प्रलंबित तपासणी अहवाल : 137
-निगेटिव्ह अहवाल : 56937
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 229
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 2862
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या : 5031