तरुण भारत संवाद सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शुक्रवारी नव्याने 3 कोरोना बाधीत रुग्णांची भर पडली. तर एकाचा मृत्यू झाला आहे. बाधित रुग्णामध्ये 2 पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी शुक्रवारी दिली.
आज 48 जनांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 3 पॉझिटिव्ह तर 45 अहवाल निगेटिव्ह आले. अद्याप 20 अहवाल प्रलंबित आहेत. पॉझिटिव्ह रुग्णामध्ये रातांजन, ता. बार्शी, नविन विडी घरकुल, ता. द. सोलापुर आणि लऊळ, ता. माढा येथील प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. तर लऊळ, ता. माढा येथील उपचार घेत असलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला आहे.