आज एकही कोरोनाबधित रुग्ण नाही
सोलापूर / प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज मंगळवारी नव्याने एकही रुग्ण आढळले नाही. त्यामुळे ग्रामीण भागाला दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 82 कोरोबधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 45 रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी मंगळवारी दिली.
आज जिल्ह्यातील 87 जणांचे अहवाल प्राप्त झाले सर्व 87 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे पॉझिटिव असल्याने रुग्णांचा आकडा हा 82 स्थिर राहिला आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी ही बाब दिलासादायक आहे. आज 52 जणांना इंटिट्यूशनल क्वांरटाईन मधून घरी सोडण्यात आले. तर आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर 45 पैकी 29 पुरुष 14 स्त्री सिव्हिल रुग्णालयात उपचार घेत आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट – 8
बार्शी – 19
माढा- 7
माळशिरस – 2
मोहोळ- 4
उत्तर सोलापूर – 2
सांगोला – 3
पंढरपूर 7
दक्षिण सोलापूर – 30
एकूण – 82
कोव्हीड 19 तालुकानिहाय माहिती
होम क्वांरटाईन – 2615
आजपर्यंत तपासणी केलेली व्यक्ती- 1684
प्राप्त अहवाल- 1653
प्रलंबित अहवाल- 31
एकूण निगेटिव्ह – 1572
कोरोनाबाधितांची संख्या- 82
रुग्णालयात दाखल – 45
आतापर्यंत बरे – 33
मृत – 6