तरुण भारत प्रतिनिधी / सोलापुर
सोलापुर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात शनिवारी सायंकाळी 7 वाजेपर्यंत 27 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले, तर उपचार घेऊन बरे झाल्याने 19 रुग्णांना घरी सोडले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी शनिवारी दिली.
सोलापुर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात शनिवारी 238 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 27 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 211 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 27 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 18 पुरुष आणि 9 स्त्रियांचा समावेश आहे. तसेच उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी क्षेत्रात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 292 झाली आहे.
-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 3423
-पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 292
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 15
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 160
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या : 118
-प्राप्त तपासणी अहवाल : 3391
-प्रलंबित तपासणी अहवाल : 32
-निगेटिव्ह अहवाल : 3099