तरुण भारत संवाद प्रतिनिधी / कुर्डुवाडी
पुन्हा नवा आदेश उद्या गुरूवार दि.३० पासून अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील सर्व दुकाने सकाळी ९ ते सायं ५ वाजेपर्यंत चालू राहतील. शनिवार व रविवार दोन दिवस सुट्टी राहिल असे नगरपालिका मुख्याधिकारी चरण कोल्हे यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे .
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती सोलापूर यांच्याकडील सुधारित आदेशानुसार शहरातील दुकाने अस्थापने चालू करण्याबाबत सुधारित आदेश लागू केले आहेत. त्यानुसार नगरपालिका मुख्याधिकारी चरण कोल्हे यांनी दुकाने व्यापारी आस्थापना चालू करण्याबाबत खालील आदेश दिले आहेत.
शहरातील आठवडा बाजार बंद राहतील, परवानगी दिलेली दुकाने भाजी, फळे विक्री सकाळी ९ ते सायं.५ वा सुरु राहतील. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने शनिवारी व रविवारी बंद राहतील. भाजी, फळ विक्रेत्यांनी त्यांना नगरपालिकेने नेमून दिलेल्या ठिकाणीच विक्री करणेचे आहे. सदर नियमांचे पालन करणे हे बंधनकारक आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कायदेशीर कारवाईसाठी पात्र रहाल असे या आदेशात नमूद केले आहे.