कोरोनाने 4 जणांचा बळी
एकूण कोरोनाबाधित संख्या 116 वर
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार
72 व्यक्ती सिव्हिल रुग्णालयात घेत आहेत उपचार
मृत 10, तर 34 जणांची कोरोनावर मात
तरूण भारत संवाद, प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात नव्याने 6 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. यामध्ये 3 पुरुष, 3 स्त्रियांचा समावेश आहे. आज चौघांचा तर आतापर्यंत दहा जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 34 जण कोरोनावर मात करून घरी गेली आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 116 कोरोबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 72 रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी शनिवारी दिली.
पॉझिटिव्ह रुग्णामध्ये मौलाली गल्ली अक्कलकोट 1 , बागवान गल्ली अक्कलकोट 1, होटगी ता. दक्षिण सोलापूर 1, नवीन विडी घरकूल 1, अश्विनी महाविद्यालय 1 इतके रुग्ण आढळले आहेत. आज 81 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 6 पॉझिटीव्ह तर 34 अहवाल निगेटिव्ह आले. अद्याप 40 अहवाल प्रलंबित आहेत. 116 रुग्णांपैकी 72 पुरुष 44 स्त्री आहेत. तालुक्यात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 34 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढीलप्रमाणे
अक्कलकोट-14, बार्शी 19, माढा 7
माळशिरस – 4, मोहोळ 5, उत्तर सोलापूर – 9
सांगोला -3, पंढरपूर 7
दक्षिण सोलापूर – 48 एकूण 116
होम क्वांरटाईन – 2228
आजपर्यंत तपासणी केलेली व्यक्ती- 1910
प्राप्त अहवाल- 1870
प्रलंबित अहवाल- 40
एकूण निगेटिव्ह – 1755
कोरोनाबाधितांची संख्या- 116
रुग्णालयात दाखल – 72
आतापर्यंत बरे – 34
मृत – 10