जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढले सुधारित आदेश
दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी सात या वेळेत सुरू राहतील
प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर शहर जिल्ह्यात कोरोनाचा विळखा वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने आता कठोर प्रतिबंधक उपाययोजना करण्यास सुरुवात केलेली आहे. दरम्यान आज गुरुवारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सुधारित आदेश काढला असून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व दुकाने शनिवारी आणि रविवारी दि. 27 आणि 28 या दोन दिवशी बंद करण्याचा आदेश दिला आहे. तर आठवडी बाजार पूर्णपणे बंद राहणार आहे.
सोलापूर शहराबरोबर जिल्ह्यात दररोज 300 हून अधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आता कडक उपाय योजना करीत आहे. जिल्हाधिकारी शंभरकर यांनी शहराजवळून ग्रामीण भागासाठी सुधारित आदेश काढलेला आहे. जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार व जनावरांचा बाजार बंद करण्यात आले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी त्यांच्याकडे लिलावासाठी येणाऱ्या कृषिमालाच्या प्रकारानुसार नियोजन करावे, एका दिवशी, एकाच वेळी लिलाव न करता शेतमालाच्या प्रकारानुसार लिलावाचा दिवस व वेळ विभागून द्यावी अशी सूचनाही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिले आहे. बाजार समित्यांमधील लिलावाच्या नियोजनाची जबाबदारी जिल्हा उपनिबंधक सोपविण्यात आली आहे.
हे सुरू राहणार
या देशातून अत्यावश्यक सेवा, मनुष्यप्राणी व मात्रासाठी जीवनावश्यक वस्तू भाजीपाला व फळे किराणा दूध व वृत्तपत्र वितरण या बाबींना सूट देण्यात आली आहे.
खाद्यगृह परमिट रूम व बार फक्त सकाळी सात ते रात्री आठ या कालावधीत कोरोना नियमांचे पालन करून 50 टक्केच्या क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी
होम डिलिव्हरी साठी किचन व वितरण कक्ष रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी
व्यायाम शाळा, जिम, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ,खेळाची मैदाने , जलतरण तलाव हे वैयक्तिक सरावासाठी सुरू राहणार
– सर्व प्रकारची धार्मिक स्थळेही सकाळी 7 ते सायंकाळी सात या वेळेत सुरू राहतील
नागरिकांनी नियमांचे पालन करावे
नव्याने काढलेला सुधारित आदेश हा आज गुरुवार पासून लागू केला जाणार आहे. जिल्ह्यात कोरोनाचा विळखा वाढत चाललेला आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाचे कोरोनाचे नियम पाळावे. 31 मार्चनंतर कोरोनाची परिस्थिती पाहून त्या त्या वेळी या आदेशाला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला जाईल.- जिल्हाधिकारी