प्रतिनिधी / सोलापूर
शिक्षकांनी कोरोना महामारीच्या आपत्तीतून बाहेर या आणि आपल्या कामाशी निष्ठा ठेवून पुन्हा नव्या जोमाने कार्याला लागा. जिल्ह्याची गुणवत्ता राज्यामध्ये प्रथम येण्यासाठी प्रयत्न करा, अशी आवाहनात्मक सूचना सीईओ दिलीप स्वामी यांनी केले. मोहोळ नजीक पिंपरी येथील शिक्षण परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, शिक्षणाधिकारी प्राथमिक संजय राठोड, यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी ते बोलत होता. गुरू बद्दल आदर व प्रेमभाव असावा. चांगल्या शिक्षकांना शाबासकी व कारवाई बाबतही त्यांनी आपले मत व्यक्त केले. गुणवत्ता वाढीवर अधिक भर देण्यास सांगितले.
या शिक्षण परिषदेला मोहोळ तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी, शिक्षण विस्ताराधिकारी, केंद्राचे केंद्र प्रमुख, केंद्रातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महावीर उन्हाळे सर तर आभार रुपेश क्षीरसागर यांनी मानले.