आज 95 नवे कोरोनाबाधित रुग्ण, एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या 32,304 वर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शीतलकुमार जाधव यांची माहिती, 1706 व्यक्ती सिव्हिल रुग्णालयात घेत आहेत उपचार
सोलापूर / तरुण भारत संवाद प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात आज सोमवारी 104 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 95 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून यापैकी 58 पुरुष, 37 स्त्रियांचा समावेश आहे. आज 6 तर आतापर्यंत 954 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 32 हजार 304 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 1 हजार 760 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 1547 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 1452 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 95 पॉझिटिव्ह आढळल्या आहे. आतापर्यंत 964 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 29 हजार 634 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट – 1146
मंगळवेढा- 1453
बार्शी – 5870
माढा- 3345
माळशिरस – 5658
मोहोळ- 1619
उत्तर सोलापूर – 740
करमाळा- 2056
सांगोला – 2509
पंढरपूर 6458
दक्षिण सोलापूर – 1450
एकूण – 32,304
होम क्वांरटाईन – 2197
एकूण तपासणी व्यक्ती- 267961
प्राप्त अहवाल- 267922
प्रलंबित अहवाल- 39
एकूण निगेटिव्ह – 235619
कोरोनाबाधितांची संख्या- 32,304
रुग्णालयात दाखल – 1706
आतापर्यंत बरे – 29, 634
मृत – 964