तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात गुरुवारी 557 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून यापैकी 359 पुरुष, 198 स्त्रियांचा समावेश आहे. आज 12 तर आतापर्यंत 557 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 19 हजार 305 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 6 हजार 578 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.टी जमादार यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 3362 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 2805 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 557 पॉझिटिव्ह आढळल्या आहे. 19 हजार 305 रुग्णांपैकी 11 हजार 877 पुरुष, 7 हजार 428 स्त्री आहेत. आतापर्यंत 543 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 12 हजार 184 जण बरे होऊन घरी गेले आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे –
– अक्कलकोट – 820
– मंगळवेढा – 922
– बार्शी – 3678
– माढा – 1910
– माळशिरस – 2745
– मोहोळ – 856
– उत्तर सोलापूर – 636
– करमाळा – 1381
– सांगोला – 1239
– पंढरपूर – 3945
– दक्षिण सोलापूर – 1173
एकूण – 19, 305
– होम क्वांरटाईन – 5786
– एकूण तपासणी व्यक्ती- 149858
– प्राप्त अहवाल- 149716
– प्रलंबित अहवाल- 142
– एकूण निगेटिव्ह – 130411
– कोरोनाबाधितांची संख्या- 19, 305
– रुग्णालयात दाखल – 6578
– आतापर्यंत बरे – 12,184
– मृत – 543