तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात बुधवारी 503 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून यापैकी 318 पुरुष, 185 स्त्रियांचा समावेश आहे. आज 10 तर आतापर्यंत 628 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 22 हजार 670 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 7 हजार 112 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी जमादार यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने आज कोरोनाबाधितांचा अहवाल दिला आहे. आज 2668 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 2165 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 503 पॉझिटिव्ह आढळल्या आहे. 22 हजार 670 रुग्णांपैकी 13 हजार 97 पुरुष, 8 हजार 664 स्त्रिया आहे. आतापर्यंत 628 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 14 हजार 930 जण बरे होऊन घरी गेले आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट – 856
मंगळवेढा – 1040
बार्शी – 4202
माढा – 2286
माळशिरस – 3646
मोहोळ – 957
उत्तर सोलापूर – 658
करमाळा – 1757
सांगोला – 1589
पंढरपूर – 4459
दक्षिण सोलापूर – 1220
एकूण – 22, 670
होम क्वांरटाईन – 4973
एकूण तपासणी व्यक्ती- 170753
प्राप्त अहवाल- 170622
प्रलंबित अहवाल- 131
एकूण निगेटिव्ह – 147953
कोरोनाबाधितांची संख्या- 22, 670
रुग्णालयात दाखल – 7112
आतापर्यंत बरे – 14,930
मृत – 628