आज 133 कोरोनाबाधित रुग्ण आढळले
सोलापूर \ प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात एकाच दिवशी 151 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज सोमवारी 133 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून यापैकी 78 पुरुष, 55 स्त्रियांचा समावेश आहे. आज 4 तर आतापर्यंत 889 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 29 हजार 984 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 2 हजार 935 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 775जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 642अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 133 पॉझिटिव्ह आढळल्या आहे . आतापर्यंत 889 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 26 हजार 160 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढीलप्रमाणे –
अक्कलकोट – 1072, मंगळवेढा- 1379, बार्शी – 5400, माढा-3106, माळशिरस – 5214,मोहोळ- 1404,उत्तर सोलापूर – 719,करमाळा- 2012, सांगोला – 2388, पंढरपूर – 5884 , दक्षिण सोलापूर – 1406 एकूण – 29, 984
अशी संख्या असून –
होम क्वांरटाईन – 4202
एकूण तपासणी व्यक्ती- 232703
प्राप्त अहवाल- 232657
प्रलंबित अहवाल- 47
एकूण निगेटिव्ह – 202673
कोरोनाबाधितांची संख्या- 29,984
रुग्णालयात दाखल – 2935
आतापर्यंत बरे – 26, 160
मृत – 889