जिल्हा आरोग्य अधिकारी बी.टी. जमादार यांची माहिती, 6395 व्यक्ती सिव्हिल रुग्णालयात घेत आहेत उपचार
सोलापूर / तरुण भारत संवाद प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात मंगळवारी 298 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून यापैकी 194 पुरुष, 184 स्त्रियांचा समावेश आहे. आज 3 तर आतापर्यंत 669 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 24 हजार 672 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 6 हजार 397 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.टी जमादार यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 2143 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 1845 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 298 पॉझिटिव्ह आढळल्या आहे . आतापर्यंत 669 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 17 हजार 608 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट – 1022
मंगळवेढा- 1143
बार्शी – 4534
माढा- 2463
माळशिरस – 4059
मोहोळ- 1042
उत्तर सोलापूर – 683
करमाळा- 1866
सांगोला – 1824
पंढरपूर 4782
दक्षिण सोलापूर – 1252
एकूण – 24, 672
होम क्वांरटाईन – 4140
एकूण तपासणी व्यक्ती- 182633
प्राप्त अहवाल- 182578
प्रलंबित अहवाल- 56
एकूण निगेटिव्ह – 157906
कोरोनाबाधितांची संख्या- 24, 672
रुग्णालयात दाखल – 6395
आतापर्यंत बरे – 17,608
मृत – 669