तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
गौराई आगमनाच्या दिवशी जिल्ह्यासाठी शुभवार्ता मिळाली असून, 187 रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना डिश्चार्ज देण्यात आले, तर नव्याने 350 रुग्ण आढळून आले. एकाच दिवसात शहर-जिल्ह्यात मिळून दहा जणांचा मृत्यू झाला. बरे होण्याचे प्रमाण, वाढते रुग्ण आणि मृत्यूच्या प्रमाणामुळे नागरिक कोरोनाच्या भीतीखाली आहेत.
ग्रामीण भागात मंगळवारी 311पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर आठ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रुग्णालयातून बरे होऊन 103 रुग्ण घरी परतले, तर एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 10 हजार 27 वर पोहोचल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी सांगितले. 1 हजार 213 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 311 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, तर 902 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. यामध्ये 219 पुरुष आणि 92 महिलांचा समावेश आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 10 हजार 27 झाली आहे. शहारात नव्याने 39 पॉझिटीव्ह रुग्ण आढळले, तर उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. बरे झाल्याने 88 जणांना घरी सोडण्यात आल्याचे मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले. 1 हजार 458 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 39 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, तर 1 हजार 419 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 39 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 23 पुरुष तर 16 महिलांचा समावेश आहे. एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6 हजार 382 झाली आहे.
ग्रामीणमधील संख्या
एकूण तपासणी ः 75 हजार 268
पॉझिटिव्ह रुग्ण ः 10 हजार 27
प्राप्त तपासणी अहवाल ः 75 हजार 105
प्रलंबित तपासणी अहवाल ः 163
निगेटिव्ह अहवाल ः 65 हजार 709
आजपर्यंत एकूण मृतांची संख्या ः 283
रुग्णालयात दाखल बांधित ः 2 हजार 797
रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले ः 6 हजार 947
शहरातील संख्या
एकूण तपासणी ः 58 हजार 210
पॉझिटिव्ह रुग्ण ः 6 हजार 382
प्राप्त तपासणी अहवाल ः 58 हजार 210
प्रलंबित तपासणी अहवाल ः 00
निगेटिव्ह अहवाल ः 51 हजार 828
एकूण मृतांची संख्या ः 403
रुग्णालयात दाखल बांधित ः 1 हजार 35
बरे होऊन घरी गेलेले ः 4 हजार 944