सोलापूर / प्रतिनिधी
सोलापूर शहरात आज बुधवारी 232 तर ग्रामीण भागात 1222 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर शहर जिल्ह्यात एकाच दिवशी 38 रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात आज नवे कोरोनाबाधित 1646 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून एकाच दिवशी 19 रुग्णांचा मृत्यू तर 814 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. 1646 पैकी 962 पुरुष, 684 स्त्रियांचा समावेश आहे. तर आतापर्यंत 1588 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 70 हजार 925 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 11 हजार 512 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 7840 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 6194 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 1646 पॉझिटिव्ह आढळल्या आहे. आतापर्यंत 1588 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 57 हजार 825 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
सोलापुर शहरात नव्याने 232 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले. तर 492 रुग्ण बरे होऊन घरी परतले तर उपचार दरम्यान झाल्याने 19 रुग्णाचा मृत्यु झाला असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.
सोलापुर शहरात 2291 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 232 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 2059 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 232 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 119 पुरुष तर 113 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 24 हजार 745 झाली आहे.