शहरात 96, जिल्ह्यात 137 रुग्ण, शहरात 4 ग्रामीण भागात सहा जणांचा मृत्यू
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर शहरात आज 96 तर जिह्यात 137 असे एकूण 233 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. शहरातील बरे झालेल्या तब्बल 312 रुग्णांना उपचारानंतर आज घरी सोडण्यात आले. शहरात उपचारा दरम्यान 4 तर ग्रामीण भागात सहा जणांचा मृत्यू झाला. सोलापूर जिह्यातील ग्रामीण भागात शनिवारी 71 पुरुष, 66 स्त्रिया कोरोनाबाधित झाल्या. जिह्यातील ग्रामीण भागात एकूण 2666 कोरोबधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 1668 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी जमादार यांनी शनिवारी दिली. आजचे कोरोनाबाधित रुग्ण मोहोळ , दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, पंढरपूर, करमाळा, बार्शी, सांगोला तालुक्?यातील आहेत.
जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने आज कोरोनाबाधितांचा अहवाल दिला आहे. आज1375 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील1238 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर137 पॉझिटिव्ह आढळल्या आहे. 2666 रुग्णांपैकी 1631 पुरुष1035 स्त्री आहेत. तालुक्मयात आतापर्यंत 69 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 929 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
सोलापूर शहरात शनिवारी 1147 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 96 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 1051 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 96 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 60 पुरुष तर 36 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4401 झाली आहे. तसेच उपचारादरम्यान 1 जणांचा मृत्यू झाला, असे मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले.
शहरातील कोरोना रुग्णांची स्थिती
एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती ः 25194
शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती ः 4401
प्राप्त तपासणी अहवाल ः 24740
प्रलंबित तपासणी अहवाल ः 454
निगेटिव्ह अहवाल ः 20339
आजपर्यंत एकूण मृतांची संख्या ः 342
रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या ः 1261
रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या ः 2798
जिल्ह्यातील संख्या पुढीलप्रमाणे
अक्कलकोट 426
मंगळवेढा 64
बार्शी 665
माढा 96
माळशिरस – 108
मोहोळ- 192
उत्तर सोलापूर – 215
करमाळा- 68
सांगोला – 36
पंढरपूर 310
दक्षिण सोलापूर – 486
एकूण – 2666
होम क्वॉरंन्टाईन – 3547
आजपर्यंत तपासणी केलेली व्यक्ती- 20464
प्राप्त अहवाल- 20356
प्रलंबित अहवाल- 108
एकूण निगेटिव्ह – 17691
कोरोनाबाधितांची संख्या- 2666
रुग्णालयात दाखल – 1668
आतापर्यंत बरे – 929
मृत – 69