एकाच दिवसात १२ जणांचा मृत्यू, नव्याने १२४ रुग्णांची भर
तरूण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
जिल्ह्यात वाढत्या कोरोनाचा आलेख खाली उतरत असल्याने दिलासा मिळत असून, मंगळवारी नव्याने ३७२ रुग्णांनी कोरोनावर मात करत विजय मिळविला. नव्याने १२४ रुग्ण आढळले, तर एकाच दिवसात १२ जणांचा मृत्यू झाला आहे.
ग्रामीण भागात 327 रुग्ण कोरोनामुक्त झाले. 93 कोरोनाबाधितांची भर पडली असून, यापैकी 62 पुरुष, 31 महिलांचा समावेश आहे. आज 9, तर आतापर्यंत 842 जणांचा मृत्यू झाला आहे. 1 हजार 613 जणांच्या अहवालामध्ये 1 हजार 520 जण निगेटिव्ह, तर 93 जण पॉझिटिव्ह आढळले. शहारात नव्याने 31 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला, तर उपचार घेऊन बरे झाल्याने 46 जणांना घरी सोडण्यात आले. 346 जणांच्या अहवालामध्ये 31 जण पॉझिटिव्ह, तर 315 जण निगेटिव्ह आढळले. 31 रुग्णांमध्ये 21 पुरुष तर 10 महिलांचा समावेश आहे.
ग्रामीणमधील संख्या
होम क्वारंटाईन – 4,158
एकूण तपासणी- 2,23,894
प्राप्त अहवाल- 2,23,850
प्रलंबित अहवाल- 44
एकूण निगेटिव्ह – 1,94,724
कोरोनाबाधितची संख्या- 29,127
रुग्णालयात दाखल – 3,322
आतापर्यंत बरे – 24,963
मृत – 842
शहरामधील संख्या
एकूण तपासणी : 88,407
पॉझिटिव्ह रुग्ण : 9,306
प्राप्त अहवाल : 88,407
प्रलंबित अहवाल : 00
निगेटिव्ह अहवाल : 79,101
एकूण मृत : 517
-रुग्णालयात दाखल : 624
बरे झालेले : 8,165