प्रतिनिधी / अक्कलकोट
अक्कलकोट ते चपळगाव रस्त्यावरील नवीन पुलाखाली ट्रक च्या अपघातात चपळगाव येथील रोहन राम व्हनकडे वय २० या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर कल्याणी मुनाळे वय २० रा काझीकणबस ता अक्कलकोट हा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना दि ८ रोजी ४ वाजता घडली आहे.
याबाबत माहिती अशी की, चपळगाव येथील रोहन राम व्हनकडे वय २० हा अक्कलकोट येथे विद्युत महावितरणमध्ये वायरमन म्हणून कामास होता.कामाच्या निमित्ताने दररोज अक्कलकोट ते चपळगाव आपल्या दुचाकीवरून जात असे. दि ८ रोजी सायंकाळी ४ च्या दरम्यान रोहन व्हनकडे व मित्र कल्याणी मुनाळे चपळगाव कडे येत असताना रोहन दुचाकी चालवत होता त्यावेळी मालट्रक क्र एम एच १३ सी यू ४८६४ चालक दत्तात्रय सिद्राम बंडगर रा मुरारजी पेठ सोलापूर यांनी आपल्या ताब्यातील ट्रक ही भरधाव वेगाने व चुकीच्या मार्गे चालवून दुचाकी ( एम एच १३ बी एक्स ४४३५ ) चालक रोहन व्हनकडे व त्याचा मित्र कल्याणी मुनाळे यांच्या गाडीस जोरात धडक देऊन दोघांना गंभीर जखमी केले.
दोघांना गंभीर मार लागल्याने त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट येथे घेऊन गेले असता डॉक्टरांनी तपासून पाहिले तर उपचारापूर्वीच रोहन राम व्हनकडे मयत झाला होता. व कल्याणी मुनाळे हा गंभीर जखमी असल्याने सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यास सांगितले. सदरच्या अपघातास ट्रक चालक दत्तात्रय बंगडर हाच कारणीभूत आहे म्हणून अजिंक्य अशोक कांबळे वय २४ रा खासबाग गल्ली हसापूर रोड अक्कलकोट यांनी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र राठोड हे करीत आहेत.