तरुण भारत संवाद सोलापूर / प्रतिनिधी
सोलापुरात पाच्छा पेठ परिसरात दोन कोरोना बाधित रुग्ण आढळले होते. त्यापैकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. एका महिलेवर उपचार सुरू आहे. त्या मृत व्यक्तीशी संबंधित आलेल्या एकूण 148 व्यक्ती आले असून त्यासर्वांची तपासणी करण्यात आली. यापैकी 125 जणांचा अहवाल प्राप्त झाला असून 124 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर महिला पॉजीटिव्ह आढळली आहे. त्या मृत व्यक्तीच्या संपर्कात 23 व्यक्तींचा अहवाल प्रलंबित असल्याची माहिती अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी बुधवारी दिली.
सोलापुरातील पाच्छा पेठ येथील एक व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आला होता. जिल्हा प्रशासनास माहिती मिळताच त्या भागात सर्वेक्षण करण्यात आले. त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 148 पैकी 124 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. एक महिलाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून तिच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. त्या महिलेच्या संपर्कात एकूण 22 व्यक्ती आले असून त्यांना आयसोलेशन वार्डात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या थुंकीचे नमुने घेण्यात आले आहेत. या सर्वांचा अहवाल संध्याकाळपर्यंत येईल असेही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले. एकंदरीत दुपारपर्यंत सोलापुरात एकही कोरोनाबाधित रुग्णात वाढ झालेले नसल्याचे चित्र होते.