कुर्डुवाडी / प्रतिनिधी
कुर्डुवाडी नगरपालिकेच्या बुधवारी व्हीडिओ काॅन्फरन्सींगद्वारे झालेल्या सर्वसाधारण सभेत रेल्वे काॅलनी परिसरात पोलिस चौकी होण्याबाबत विचार करणे, कोरोना प्रादुर्भाव झालेल्या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्च देणे, मराठी शाळेमध्ये अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र बांधणे व त्याच ठिकाणी कोविड केअर सेंटर तयार करुन विद्युत कनेक्शन घेणे आदी प्रमुख विषयांसह एकूण ३६ विषयांना मंजूरी देण्यात आली . अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष समीर मुलाणी हे होते.
या व्हिडिओ काॅन्फरन्सिंग सभेला उपनगराध्यक्षा उर्मिला बागल,नगर सेविका जनाबाई चौधरी,राधिका धायगुडे,अनिता साळवे,वनिता सातव,दमयंती सोनवर,शहनाज मुलाणी,नगसेवक संजय गोरे,अरूण काकडे,बबन बागल,प्रकाश गोरे,आयुब मुलाणी, मुख्याधिकारी समीर भुमकर,आरोग्य निरीक्षक तुकाराम पायगण,अतुल शिंदे,रवींद्र भांबुरे, अभियंता वैशाली मठपती,रोहित वाघमारे,स्वप्निल बाळेकर, कोमल वावरे आदी प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.