पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला
निलंगा / प्रतिनिधी
दोन गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पुरूष जातीचे दोन मृतदेह आढळुन आले आहेत. यामुळे परिसरात एकच खळबळ उडली असुन पोलिस पुढील तपास करत आहेत.
निलंगा तालुक्यातील मांजरा नदीपात्रात गिरकचाळ येथे कोल्हापुरी बंधाऱ्यात पाण्यामध्ये तरंगत असलेले अज्ञात व्यक्तीचे प्रेत आढळले आहे. तर अंबुलगा बु कारखाना येथील लांबोटा तोगरी मोड हायवेच्या कडेला असलेल्या झुडपामध्ये सदर पुरुष जातीचे प्रेत आढळले असून गिरकचाळ येथे पाण्यात फुगलेल्या अवस्थेत आहे. तर दोन्ही ठिकाणच्या मयताची ओळख अद्याप पटलेली नाही.
दोन्ही व्यक्तींची हत्या की आत्महत्या हा प्रश्न पोलिसांसमोर उभा आहे. पोलिस प्रशासन सोशल मिडियाच्या माध्यमातून सदरील दोन्ही प्रेताची ओळख पटवण्यासाठी माहिती प्रसारीत करत आहे. अद्याप तरी ओळख पटली नसून त्सासाठी शिरूर अनंतपाळ व निलंगा पोलिस प्रयत्न करत आहेत. ओळख न पटलेल्या व बेवारस दोन्ही प्रेताचा पंचनामा करून पोलिसांनी प्रेत ताब्यात घेतले असून उत्तरिय तपासणीसाठी शासकीय रूग्णालयात ठेवण्यात आले आहे. कारखाना परिसरात आढळलेल्या प्रेताच्या पँटच्या खिशात पिस्तूल कंपनीची काडीपेटी सापडली असून यावर तपास लावण्यास पोलिसांना सोपे जाणार आहे.