तरुण भारत संवाद वार्ताहर / पंढरपूर
बुधवारी मध्यरात्री झालेल्या पावसाने पंढरपूर तालुक्यातील ओढे-नाले तुडूंब भरुन वाहु लागले आहेत. काही ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्याने ग्रामीण भागातील वाहतूक विस्कळीत झाली असून पंढरपुरात उच्चांकी 75 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून एकूण 277 मिलिमीटर पाऊस शहर, तालुक्यात झाला आहे. यंदाच्या मौसमातील हा उच्चांकी पाऊस असुन शहर परिसरात अतिवृष्टी झाली आहे.
जुलै महिन्यात शहर तालुक्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. एक-दोन दिवसांची उघडीप देत पाऊस चांगलाच बरसत आहे. पावसामुळे ऊस, मका, कडवळ पिकांची वाढ जोमाने होत असून फळबागा व भाजीपाला यांच्यावरती रोगराई वाढतच चालली आहे. शिरढोण – कौठाळी रस्त्यावर पाणी आल्याने या ठिकाणची वाहतूक खोळंबली आहे तर चिलाईवाडी, गुरसाळे आदी परिसरातील ओढे-नाले खळखळून वाहत आहेत.
पंढरपुर तालुका दि. 30 जुलै 2020 रोजी पर्जन्यमान मंडळनिहाय खालीलनुसार आहे.
करकंब 15 मिमी
पट कुरोली 31 मिमी
भंडीशेगाव 30 मिमी
भाळवणी 25 मिमी
कासेगाव 28 मिमी
पंढरपूर 75 मिमी
तुंगत 32 मिमी
चळे 24 मिमी
पुळुज 17 मिमी
एकूण पाऊस 277 मिमी
सरासरी पाऊस 30.77 मि. मी.
आज दि. 30 जुलै 2020 अखेर सरासरी पाऊस 323.22 मिलिमीटर पावसाची नोंद आहे.