पंढरपूर / प्रतिनिधी
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामधे पोटनिवडणुकीसाठी प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 68 टक्के मतदान झाले. सकाळपासून मतदान सुरू झालेल्या मतदानाला दुपारनंतर अधिकची गती मिळाली. यंदा तब्बल 12 तास मतदान चालू होते. तर सायंकाळी 7 वाजेपर्यंत कोरोना रूग्णांनी देखिल मतदानाचा हक्क बजावला. असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.
येथील शहरासह मंगळवेढ्यात सकाळी सात वाजले पासून मतदान सुरू करण्यात आले. यामधे भाजपाचे उमेदवार समाधान अवताडे यांनी कुंटुबियासह मंगळवेढयात. तर राष्ट्रवादीचे उमेदवार भगिरथ भारत भालके यांनी कुंटुबियांसह पंढरपूरात मतदानाचा हक्क बजावला. आ.प्रशांत परिचारक यांनी तालुक्यातील खर्डी या त्यांच्या मूळगावी मतदान केले.
यंदा मतदानावर प्रारंभी कोरोनाचे संकट दिसून आले. कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यासाठी बहुतांश मतदान केंद्रांवर सॅनिटायझर , थर्मल स्क्रिनिंग आदि उपकरणे ठेवण्यात आली होती. मात्र काही मतदान केंद्रावर कोरोना नियमांची पायमल्ली करण्यात आली. काही ठिकाणी तांत्रिक बिघाडामुळे काहीकाळ मतदान थांबले होते. मात्र पुन्हा मतदान प्रक्रिया सुरळित चालू राहीली. यंदा 80 वर्षावरील मतदारांनी घरातूनच पोस्टल पध्दतीने मतदान केले आहे.
साधारणपणे सकाळी अकरा वाजेपर्यत 19 टक्यांच्या आसपास मतदान होते. तर दुपारी 1 वाजेपर्यत हीच मतांची आकडेवारी सुमारे 33 टक्यांपर्यत होती. तर दुपारी 3 वाजता मतदानाचा टक्का वाढला. आणि मतदान हे सुमारे 45 टक्यांपर्यत जाउन पोहोचले गेले. तर सहा वाजेपर्यंत 58 टक्के मतदान झाले होते.