ट्रक ड्रायव्हर जागीच ठार, एक जखमी
तरूण भारत संवाद प्रतिनिधी / पंढरपूर
तालुक्यातील रोपळे याठिकाणी पहाटेच्या सुमारास ट्रक्टर आणि ट्रकच अपघात घडला. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथे पंढरपूर-कुर्डुवाडी मार्गावर असणाऱ्या पेट्रोल पंपनजीक ऊसाने भरलेला ट्रॅक्टर व ट्रकचा अपघात होऊन ट्रक ड्रायव्हर जागीच ठार झाला. तर आणखी एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. अपघातातील ट्रक कुर्डूवाडीकडून पंढरपूरकडे तर उसाचा ट्रॅक्टर पंढरपूरहून कुर्डूवाडीकडे निघाला होता. हा ट्रॅक्टर पंढरपूर तालुक्यातील खेड भाळवणी येथील असल्याचे समजते.
या भीषण अपघातामध्ये ट्रक व ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.