प्रतिनिधी / बार्शी
कव्हे ता. बार्शी येथील रोहिणी धनाजी शिंगण वय २४ वर्ष आणि रोहिणी धनाजी शिंगण वय २ वर्ष रा कव्हे ता बार्शी या आई आणि मुलीचा अज्ञात कारणाने पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना आज बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
अधिक माहिती अशी की धनाजी शिंगण हे आज सकाळी बहिणीला भेटण्यासाठी बार्शीत बहिणीच्या घरी असताना धनाजीचा चुलतभाऊ रवी शिंगण याचा फोन आला आणि तो म्हणाला की गळ्यात घाटी असलेली म्हैस तुझीच आहे का ? ती म्हैस रमेश माने यांच्या विहिरीजवळ बांधलेली आहे. आणि विहिरीत एक महिला व एक लहान खाली तोंड करून मुलगी पाण्यावर तरंगत आहे.
असे सांगितले म्हणून धनाजीने गावाकडे जाऊन बघितले असता पत्नी रोहिणी आणि मुलगी आरोहीचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले त्यानंतर ही खबर पोलिसांना देण्यात आली आणि पोलिसांसमोर गावातील सुशांत दगडू शिंगण, सुरेश गजेंद्र घळके, सुहास रामचंद्र शिंगण, वैगरे लोकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबरोबर काढण्यात आले याबाबत कोणताही संशय नसल्याचे ही पतीने स्पष्ट केले आहे याबाबत तालुका पोलीस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास पो. हे. कॉ. रियाज शेख करत आहेत.