तरुण भारत संवाद
प्रतिनिधी/ कुर्डुवाडी
पिक अप आणि मोटारसायकलच्या समोरासमोर झालेल्या धडकेत मोटारसायकलवरील आजोबा व नातू जागीच ठार झाल्याची घटना घडली. अभिजित रमेश मोरे (वय–२२, रा. कन्हेरगाव), महादेव नामदेव डांगे (६५, रा. पिंपळनेर (डोणवाडी) ता. माढा) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. कुर्डू, ता. माढा येथे आज, रविवारी (दि.२) दुपारच्या सुमारास हा अपघात झाला.
याबाबत माहिती अशी की, टेंभुर्णीकडून कुर्डुवाडीच्या दिशेने बोलेरो पिकअप क्रमांक (एम–२४–ए.बी–६३२५) भरधाव वेगात निघाली होती. ही पिकअप कुर्डू हद्दीत झुंडरे वस्ती नजीक आली असतात ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरुन येणाऱ्या मोटारसायकल क्र. (एमएच–४५–डब्ल्यू–९९४३) ला जोराची धडक झाली. या धडकेत मोटारसायकलवरील आजोबा व नातू जागीच ठार झाले.