हिरोळी खून प्रकरणात पत्नीच ठरली व्हिलन
तरूण भारत संवाद प्रतिनिधी / अक्कलकोट
प्रेमात अडथळा ठरत असल्यामुळे कर्नाटकातील आळंद तालु क्यातील मल्लप्पा सुनगारचा त्याची पत्नी लक्ष्मी (वय 30) हिनेच काटा काढला आहे. प्रियकर गुटल्या(उर्फ) सैफन बोबडे याला सांगून सुपारी देऊन मल्लप्पा सुनगार यांना ठार मारण्यात आले. मल्लप्पा सुनगार याचे पोत्यात बांधलेले प्रेत सांगवी नदीच्या पात्रात आढळून आले होते. यानंतर मोठी खळबळ सांगवी परिसरात आणि अक्कलकोट तालुक्यात उडाली होती.
यानंतर अक्कलकोटच्या उत्तर पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी शिताफीने तपासाची चक्रे फिरवित या गुन्ह्यात सहभागी असलेल्या चार जणांना तात्काळ अटक केली होती. हे सर्व आरोपी लक्ष्मीचा प्रियकर सैफन उर्फ गटल्या बोबडे याने आपल्याला सुपारी देऊन मल्लप्पाचा खुन करण्यास सांगितले होते असा जवाब दिला. यानंतर पोलीसानी या प्रकरणात अधिक लक्ष घालून तपास सुरूच ठेवला असता भिमु गोमू राठोड (रा दुधनी तांडा) याला ताब्यात घेतले. भिमु राठोड याने सविस्तर हकीकत सांगितले आणि मल्लप्पाची पत्नी लक्ष्मी सुनगार हिने मल्लप्पाला मारून टाकण्यासाठी आपणांस 50 हजार रुपयांची उधार सुपारी दिल्याचे कबूल केले. यानंतर यातील हवालदार गिते यांनी हिरोळी येथे जाऊन लक्ष्मी हिला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. तिच्याकडे विचारपूस केली, परंतु सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या लक्ष्मी सुनगार हिने पती मलप्पा सुनगार याचा खून करण्यासाठी आपण माझा प्रियकर सैफन उर्फ गटल्या बोबडे याला सांगितले होते. यानंतर सैफन उर्फ गटल्या याने पती आपल्या प्रेमात अडसर ठरत आहे आणि त्याची पत्नी ही मल्लप्पाला मारून टाकण्यासाठी सहमती दिली आहे म्हणून त्याने दुधनीच्या गांधीनगर तांडा येथील संजय हिरु राठोड (वय 27 ) याला सुपारी दिली.
संजय राठोड याने आपले इतर साथीदार, अनिल शिवपुत्र लिंगशेट्टी (वय 22 वर्षे, रा हिरोळी तालुका आळंद जिल्हा गुलबर्गा ) आणि वाघेशा इरणा हनमशेट्टी (वय 30 वर्षे रा. हिरोळी ता. आळंद जि. गुलबर्गा ) या सर्वांनी मिळुन मल्लप्पा चा दिनांक 3 ते4 ऑक्टोबर 20 च्या दरम्यान दुधनीच्या शिवारात खुन करून प्रेत सांगवी गावाजवळ नदीच्या पात्रात आणून टाकले होते.दिनांक9 ऑक्टोबर 20रोजी हे प्रेत स्थानिक नागरिकांना आढळुन आल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन प्रेत ताब्यात घेऊन तपास सुरू केले होते. मयत मल्लप्पा सुनगारचे मोबाईल तपासल्या नंतर आरोपीचा सुगावा लागल्यानंतर सर्वप्रथम सैफन उर्फ गुटल्या बोबडे याला ताब्यात घेऊन तपासाची चक्रे फिरविली असता मयताची पत्नी लक्ष्मी हिने प्रियकर गटल्याच्या साहाय्याने खून करण्याचा कट रचला आणि 50 हजाराची सुपारी मारेकरी यांना दिली.मारेकरी याना ही उधार सुपारी चांगलीच महागात पडली.या खुन प्रकरणातील सर्व आरोपींना पोलीसांनी तात्काळ अटक केली आहे.
या खुनाचा मुख्य सुत्रधार मयत मल्लप्पा याची पत्नी लक्ष्मी आणि दुसरा एक आरोपी संजय राठोड (रा दुधनी तांडा) या दोघांना तात्काळ अटक करण्यात आली. या खुण प्रकरणात आता पर्यत मयताची पत्नी लक्ष्मी सह 6 जणांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पो. नि. के.एस पुजारी हे करीत आहेत. उत्तर पोलीस ठाण्याच्या पोलीसांनी अतिशय शिताफीने काम करत या खून प्रकरणातील आरोपीनां अटक केले. पोलीस निरीक्षक कलप्पा पुजारी यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि.विलास नाळे,पोहेकॉ अंगद गिते,पोहेकॉ यमाजी चव्हाण,पोहेकॉ मनोज भंडारी, पोना प्रविण वाळके,पोना धनू राठोड, सोलापूर ग्रमीणचे सायबर सेल पोकॉ रवी हातकिले यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी परिश्रम घेतले.