प्रतिनिधी / बार्शी
बार्शी विधानसभा मतदार संघाचे भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊत यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे फेसबुक लाइव्ह वरुन त्यांना धमकी देण्यात आली आहे. असा आरोप करण्यात आला आहे. नवी मुंबईच्या पनवेल या ठिकाणच्या असणाऱ्या नंदू उर्फ बाबा पाटील याने ही धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. बाबा पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बार्शी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. याप्रकरणी बार्शी पोलीस ठाण्यात भादवि कलम 507 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांच्या विरोधात राजकारण कराल तर मुंबईतून बाहेर पडू देणार नाही, अशी धमकी राजेंद्र राऊत यांना देण्यात आली आहे.