बार्शी / प्रतिनिधी :
बार्शी येथील मोमीन पुरा यंग सर्कल या मंडळाच्या वतीने बार्शीतील नागरिकांसाठी मोफत मास्क देण्यासाठीचे एक स्टॅन्ड उभा केला असून आता या ठिकाणावरून घाई गडबडीमध्ये मास्क घरी विसरला असेल किंवा ज्यांना मास्क घेण्यासाठी पैसे नाहीत अशा नागरिकांना या ठिकाणावरून मोफत मास्क मिळणार आहेत. हा मोफत मास्कचा स्टँड मल्लप्पा धनशेट्टी रोड , मदिना मस्जिद जवळ मोमीन पुरा यंग सर्कलच्या युवकांनी हा स्टँड तयार करून गोर गरीब नागरिकांसाठी उभा केला आहे. यासाठी मोहसीन तांबोळी,अबू शेख,इम्तियाज़ शेख, शाबाज़ शेख, जाकिर शेख, रिज़वान तांबोळी, तोफिक सय्यद, संतोष फिस्के,शिवा घोने, किरण गलांडे, रजा शेख
अलीम मुल्ला यांनी कष्ट घेतले आहेत. तर या मोफत स्टॅन्ड चे सर्व स्तरातून स्वागत होत असून मोमिनपुरा सर्कल या मंडळाचे कौतुक होत आहे