तरुण भारत संवाद प्रतिनिधी/बार्शी
बार्शी नगर परिषदच्या वतीने वतीने आज भगवंत मंदिर कडे जाणारा रस्ता, भगवंत कमानी जवळ असणाऱ्या मोकळ्या जागेत आठ गाळ्याचे शॉपिंग सेंटर व बार्शीकर नागरिकांसाठी ओपिडी दवाखाना, हेल्थ सेंटरचे भूमिपूजन बार्शी नगर परिषद अध्यक्ष असिफ तांबोळी यांच्या हस्ते पार पडले. या वेळी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते.
या नव्याने बांधण्यात येणाऱ्या इमारतीमध्ये तळमजल्यावरती आठ गाळे व हेल्थ सेंटर तसेच पहिल्या मजल्यावर पाच हेल्थ सेंटर व ट्रेनिंग सेंटर प्रस्तावित करण्यात आले आहेत अशी माहिती बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली.
यावेळी बोलताना राऊत यांनी सांगितले की, सदरची इमारती मुख्य बाजारपेठांमध्ये असल्याने आकर्षक आणि चांगल्या दर्जाची बांधण्यात यावी अशा सूचना दिल्या आहेत. यावेळी नगरसेवक संतोष बारंगुळे, राजभाऊ पोकळे , अॅड. महेश जगताप विनोद चोप्रा, मुख्याधिकारी शिवाजी गवळी, नगर अभियंता भारत विधाते, जलदाय व्यवस्था अभियंता अजय होनखांबे आदी उपस्थित होते.