प्रतिनिधी / करमाळा
करमाळा-अहमदनगर राज्यमार्ग रस्त्यावर मांगी गावाजवळ मोटरसायकला अज्ञात वाहनाने धडक देवून झालेल्या अपघातात मोटरसायकलवरील दोघे जागीच ठार झाले. रविवार दि. ३० मे रोजी सकाळी हा अपघात घडला.
यावेळी तिथे असणाऱ्या प्रवाशांनी या अपघाताची माहिती पोलीसांना कळवली. आष्टी (जि.बीड) येथे कामानिमित्ताने लक्ष्मण लोखंडे (रा.आरोळेवस्ती, जामखेड) व महेश शिंदे (रा.अकलूज) हे दोघे एकत्र होते. सध्या काम बंद असल्याने ते दोघे मोटरसायकलवरून नातेवाईकांना भेटण्यासाठी निघाले होते. त्यांच्या मोटरसायकलला मांगी पुलाजवळ अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात हे दोघे गंभीर जखमी होवून जागीच ठार झाले. अपघाताची माहिती समजताच पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे,उपनिरीक्षक तानाजी पवार व सहाय्यक फौजदार वने यांनी भेट दिली आहे. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.