प्रतिनिधी / कुर्डुवाडी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी -मार्च २०२० चा दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून माढा तालुक्यात एकूण ४ हजार ७४० विद्यार्थ्यांपैकी ४ हजार ७०६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी ४ हजार ५७७ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन तालुक्याचा निकाल ९७ .२५ टक्के लागला आहे. तालुक्यामध्ये एकूण ४७ शाळांचा निकाल हा शंभर टक्के लागला आहे.
यामध्ये नूतन इंग्लिश मेडियम स्कूल कुर्डुवाडी, शांती विनायक माध्यमिक विद्यालय उपळाई बु,मंगल इंग्लिश स्कूल माढा, प्रोग्रेसिव इंग्लिश मेडीयम स्कूल बेंबळे, पालवण माध्य विद्यालय पालवण, संजय मामा शिंदे विद्यालय लहू, संजय मामा शिंदे विद्यालय भोगेवाडी, माध्य आश्रम शाळा जामगाव, कर्मवीर लोहकरे गुरुजी विद्यालय उजनी, वसंतराव नाईक माध्य विद्यालय महिंसगाव, भैरवनाथ हायस्कूल केवड, न्यु कै. विठ्ठलराव शिंदे प्रशाला अंबाड शिराळ, न्यु इंग्लिश स्कूल वेणेगाव, श्री. छ.शिवाजी विद्यालय वडशिंगे, मा. अजितदादा पवार हायस्कूल शिराळा टे, आर एस संस्था महात्मा फुले विद्यालय वरवडे, विष्णुपंत पाटील प्रशाला उपळाई खु,श्री विनायक विद्यालय वरवडे, न्यु इंग्लिश स्कूल रिधोरे, श्री गणेश विद्यालय पिंपळनेर, श्री. नंदिकेश्वर विद्यालय उपळाई खु., संजीवनी विद्यालय मानेगाव, न्यू इंग्लिश स्कूल घोटी, संत सावतामाळी विद्यालय अरण,श्री खेलोबा विद्यालय अंजनगाव खे, भैरवनाथ विद्यालय आलेगाव बु., विमलेश्वर विद्यालय बेंबळे, एस एस पी मंडल जगदंबा प्रशाला धानोरी, रयत शिक्षण संस्था न्यू इंग्लिश स्कूल टेंभूर्णी, ब्रह्मनाथ विद्यामंदिर अंजनगाव उमाटे, सुगंधाताई पाटील विद्यालय चिंचोली, शरद विद्यालय बारलोणी, श्री संत मानकोजी महाराज प्रशाला वाकाव, न्यू इंग्लिश स्कूल तुळशी, कै .सुगंधाताई पाटील विद्यालय भुताष्टे, न्यू इंग्लिश स्कूल वडशिंगे, संभाजीराव चव्हाण माध्यमातून. विद्यालय विठ्ठलवाडी, स्वातंत्र्य सेनानी विठ्ठलराव पाटील प्रशाला जामगाव, न्यू इंग्लिश स्कूल टाकली टे, सरस्वती माध्य विद्यालय आलेगाव बु,बाबाराव शिंदे माध्य विद्यालय बैरागवाडी, संघमित्रा माध्य विद्यालय कुर्डुवाडी, महात्मा फुले विद्यालय टेंभुर्णी, .पांडुरंगभाऊ उपळे माध्य विद्यालय अहेरगाव, सनराईज इंग्लिश मेडिअम स्कूल, जिव्हाळा विद्या मंदिर,आदर्श पब्लिक स्कूल या शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.