प्रतिनिधी / कुर्डुवाडी
माढा तालुक्यात कोरोनाचा उद्रेक होऊ पहात आहे. आज मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार माढा तालुक्यातील २० गावांतून एकूण ५७ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर १८ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. माढा तालुक्यातील मानेगाव,पापनस, बिटरगाव, भोसरे, जाखले, अकोले खु, घोटी, तळशी, लऊळ, अरण, चिंचाली, माढा या ठिकाणी प्रत्येकी १ तर, भेंड येथे २, तांदुळवाडी, मोडनिंब, कन्हेरगाव येथे प्रत्येकी ३, जाधववाडी मो. येथे ४, बावी येथे ५, टेंभुर्णी येथे ११ तर कुर्डुवाडी येथे १४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
आज तालुक्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे कुर्डुवाडी येथील असून नागरिकांनी याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोणतेही लक्षण आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. प्रशासनाने मात्र तपासण्या वाढवण्याची गरज आहे. तसेच होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या बाधितांची वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक आहे.