प्रतिनिधी / कुर्डुवाडी
माढा तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आज तालुक्यात मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार तालुक्यात १७ गावात एकूण ३८ जण कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. रोपळे क, रिधोरे,भोसरे,तडवळे म,अरण, मोडनिंब, तुळशी,लऊळ, परिते, निमगाव टें, कन्हेरगाव, टेंभुर्णी, नगोर्ली, बारलोणी, कुर्डू, कुर्डुवाडी व माढा येथे हे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
तालुक्यात एकूण ५५५ पैकी २५९ अॅन्टीजेन व २९६ स्वॅब तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी रोपळे क येथे १, रिधोरे येथे २,भोसरे येथे १,तडवळे म येथे १,अरण येथे १,मोडनिंब येथे ३, तुळशी येथे २, लऊळ येथे ५, परिते येथे १, निमगांव टें ४, कन्हेरगाव २, टेंभुर्णी ४, नगोर्ली येथे १ ,बारलोणी येथे १,कुर्डू येथे३ , कुर्डुवाडी येथे ४ तर माढा येथे २ जण असे एकूण ३८ जण कोरोनाबाधित असल्याचे अहवालात समोर आले आहे.
तर ६ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तालुक्यात रोज नवनवीन भागात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत.तरी नागरिकांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. प्रशासन आपल्यापरीने उपाययोजना करत असून नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून सर्वोतोपरी काळजी घेतली पाहिजे.