प्रतिनिधी / कुर्डुवाडी
माढा तालुक्यात आज सोमवारी १० जण कोरोना बाधित असल्याचा अहवाल तालुका आरोग्य प्रशासनाला प्राप्त झाला असून कुर्डुवाडीसह, भोसरे, टेंभुर्णी, शेवरे, भेंड, अकोले ख, येथे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.
तालुक्यात एकूण १६८ पैकी ६३ जणांची अॅन्टीजेन टेस्ट तर १०५ जणांची स्वॅब टेस्ट घेण्यात आली होती. त्यापैकी आज कुर्डुवाडी येथे २ ,भोसरे येथे २,टेंभुर्णी येथे ३ ,शेवरे येथे १,भेंड येथे १,अकोले खु येथे १ असे एकूण १० जण कोरोना बाधित असून टेंभुर्णी येथील ६१ वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला आहे.
प्रशासन पुन्हा सतर्क झाले असून नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. विनाकारण घराबाहेर पडू नये .बाहेर पडताना तोंडाला मास्क लावावा, हाथ स्वच्छ धुवावेत, सॅनीटायझरचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.