प्रतिनिधी / कुर्डुवाडी
माढा तालुक्यात कोरोनाचा उद्रेक होत असून शनिवारी दि.१० रोजी तालुक्यातील ३४ गांवात मिळून एकूण १५० जण कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ६७ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असल्याचे तालुका वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आले आहे.
आज रोपळे क.चिंचगाव,वेताळवाडी,उपळाई बु,पडसाळी,सोलंकरवाडी,आहेरगाव, कुर्डू, पिंपळनेर,शेवरे,आलेगाव खु,पिंपळखुटे या गावांत प्रत्येकी १ ,तर कव्हे,रोपळे बु,भुताष्टे ,सुरली ,कन्हेरगाव,आलेगाव बु, महिंसगाव याठिकाणी प्रत्येकी २ , भोसरे,बैरागवाडी,बावी,दहिवली,भेंड येथे प्रत्येकी ३,अकोले बु येथे ५, अरण, माढा,रांझणी येथे ६,अंबाड येथे ७,मोडनिंब येथे ९,तुळशी येथे १३,कुर्डुवाडी १४,परिते येथे २०,टेंभुर्णी येथे २३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
वरचेवर माढा तालुक्याची परिस्थिती गंभीर होत चालली असून टेंभुर्णी,कुर्डुवाडी शहरात वरचेवर रोज नवे रुग्ण आढळत आहेत. नागरिकांनी गरजेशिवाय बाहेर पडू नये. आवश्यकता असल्यास कोरोनाचे नियम पाळून दक्षता घेऊन नागरिकांनी घराबाहेर पडावे.