प्रतिनिधी / वैराग
तालुक्यातील शेळगाव (आर) येथे गावातील युवकाने प्रेमाची सक्ती करुन मानसिक त्रास दिल्यामुळे २३ वर्षाच्या युवतीने आत्महत्या केल्याची घटना घडली असून याबाबत मुलीचे वडिल लक्ष्मण सिताराम अडसुळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन युवकाविरुध्द वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादीची मुलगी प्रतिक्षा हिला गावातील सिध्देश्वर आण्णा कुंभार या युवकाने मला तू आवडतेस, तू माझ्याबरोबर प्रेम नाही केले तर मी तुला मारुन टाकीन अशी धमकी देवून दुचाकीवर तुळजापूर येथे नेऊन तिच्याबरोबर मोबाईलमध्ये काढलेले फोटो स्टेटसला ठेवले होते. याची माहिती कळाल्यानंतर फिर्यादी यांनी कुंभार याला वडिलासह बोलावून घेवून गावातील नागरिकांसमोर समज दिली होती.
त्यानंतर काही दिवसांनी मुलीकडे दोन मोबाईल सापडल्यावर ते कोणाचे आहेत असे विचारले असता तिने घराच्या पाठीमागे कचरा टाकण्याकरिता गेले होते, त्यावेळी सिध्देश्वर कुंभार हा तेथे आला व त्याने मला तू खुप आवडतेस, तू जर माझ्याबरोबर नाही बोललीस तर मी तुला मारुन टाकीन, अशी धमकी देवून त्याच्याकडील दोन मोबाईल देवून तू माझ्याशी या मोबाईलवरून बोलत जा, नाही बोलली तर बघून घेतो अशी धमकी दिली असल्याचे सांगितले.
या मोबाईलवर कुंभार वारंवार फोन करुन तू माझ्याबरोबर लग्न कर नाहीतर मी तुला मारुन टाकीन अशी धमकी देतो, त्यामुळे मला मानसिक त्रास होत आहे. मी त्याच्या त्रासाला कंटाळले आहे, असे सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांनी गावातील पोलिस पोटील ज्ञानदेव नागणे याच्या समक्ष सिध्देश्वर कुंभार यास समज दिली व त्याचे मोबाईल परत केले. त्यानंतर सायंकाळी 7 च्या सुमारास घरातील बेडरुम मध्ये प्रतिक्षा हिने कापडी ओढणीने स्लॅबच्या लोखंडी हुकला गळफास घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी सिध्देश्वर कुंभार याच्याविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल