सांगोला तालुक्यातील अनकढाळ येथील घटना
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
विजेचे काम करताना विजेचा धक्का लागून कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास अनकढाळ (ता. सांगोला) येथील अहिल्यानगर परिसरात घडली. शुभम शितोळे असे मृत कर्मचाराचे नाव आहे.
अनकढाळ येथील अहिल्यानगरात वीज पुरवठ्यासंदर्भात तक्रार आल्यानंतर महावितरणचे कंत्राटी कामगार शुभम शितोळे हे रविवारी दुरुस्तीसाठी गेले होते. विजेच्या खांबावर दुरुस्तीचे काम चालू असताना अचानक विजेचा धक्का बसून शुभम शितोळे हे बेशुध्द झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर महावितरणच्या अधिकाऱयांना पाचारण करण्यात आले. शितोळे यांना जेसीबीच्या मदत खाली काढण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शितोळे अविवाहीत असून त्यांच्या मागे