सोलापूर, प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा आज सोमवारपासून ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने सुरू झाल्या आहेत. दरम्यान पहिल्या दिवशी ऑनलाइन परीक्षेचा बोजवारा उडाला आहे. सर्वर डाऊनमुळे विद्यार्थ्यांचा सावळागोंधळ उडाला. विद्यापीठ प्रशासनाने दिलेल्या हेल्पलाईन नंबर हे नॉटरिचेबल आणि काही बंद लागले. दीड तासाचा पेपर असतांना देखील एका विद्यार्थ्यांस मिळाले अवघे 10 मिनिटं मिळाले आहे. पहिल्या दिवशी सावळागोंधळ उडाल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने पहिला दिवस आहे असे म्हणून गंभीर समस्यांना बगल दिली. दुसरीकडे विद्यार्थ्यांसह पालकांनीही विद्यापीठ प्रशासनाच्या परीक्षा नियोजनाबद्दल संताप व्यक्त केला आहे. पहिल्याच दिवशी असा गोंधळ उडाला तर दुसऱ्या दिवशीच्या परीक्षेत विद्यापीठ प्रशासनाला जाग येते का नाही असा सवालही पालकांनी केला आहे.
ऑनलाइन परीक्षेसाला विद्यार्थ्यांना हे आले समस्या
- परीक्षा देताना अचानक एरेर आल्यानंतर लॉगआऊट केल्यानंतर पुन्हा लॉग इन केल्यानंतर युवर एक्झाम इज एन्ड
- सर्वरडाऊन झाल्यानंतरही परीक्षेची वेळ तसेच सुरू असते, दुसऱ्यांदा प्रयत्न केल्यानंतर लॉगिन होत नाही आणि टाईम हे सुरूच असते
- एक प्रश्न लढण्यासाठी दोन मिनिटांचा अवधी लागतो
- दर दोन प्रश्नाला 502 बॅड गेटवे असे दाखवत आहे
- एका पेपरसाठी 90 मिनिटांचा अवधी लागतो तर मिळाले बारा मिनिट
- विद्यापीठाने दिलेला हेल्पलाइन नंबर नॉटरिचेबल, तर कोणी फोन उचलत नाही
- कुलगुरू, परीक्षा नियंत्रक शहा ही फोन उचलत नाहीत
- पेपर सोडवल्यानंतर उत्तर पत्रिका सबमिट होत नाहीत
- जे विद्यार्थी दोन विषयाच्या परीक्षा देत आहेत त्यांना एक पेपर सबमिट झाल्यानंतर दुसऱ्या विषयाचा पेपर देताना मागील विषयाचा वेळ दाखवत आहे
तर परीक्षा संचालक व कर्मचाऱ्यांवर कारवाई करा
ऑनलाईन परीक्षेस मुकलेल्या विद्यार्थीची परीक्षा त्वरीत घ्यावी व विद्यार्थीच्या नुकसानीस कारणीभूत ठरवून परीक्षा नियंत्रक व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी उच्च व तंत्रशिक्षण शिक्षण मंञी उदय सामंत साहेब व कुलगुरू यांच्या कङे निवेदनाव्दारे प्रयास संस्थेची मागणी केली आहे,
सचिन शिंदे, प्रयास संघटना
दुसऱ्या दिवशी सावळागोंधळ झाल्यास आंदोलन
सोलापूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत पहिल्या दिवशी सर्वर डाऊन सहा विविध समस्यांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे. जर दुसऱ्या दिवशी अशा समस्या आल्यास तीव्र आंदोलन छेडू.
गणेश डोंगरे
जिल्हाध्यक्ष एनएसयूआय