प्रतिनिधी / सोलापूर
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष बॅकलॉग विद्यार्थ्यांच्या परीक्षांना शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020 पासून सुरुवात होणार असून यासाठी हेल्पलाइन क्रमांक जाहीर करण्यात आल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक श्रेणिक शहा यांनी दिली.
प्रथम वर्ष बॅकलॉगच्या बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., बीबीए, बीसीए या अभ्यासक्रमाच्या सत्र एक व दोनच्या परीक्षा तसेच विधी अभ्यासक्रमाच्या एलएलबी सत्र 1 व 2, बी ए एल एल बी सत्र 1 ते 6 तसेच अभियांत्रिकी अभ्यासक्रमात एफई व एसई (CBCS) भाग 1 व 2, टीई (CGPA) भाग 1 व 2 च्या तसेच बीटेक सत्र 1 आणि आर्किटेक्चर अभ्यासक्रमाच्या सत्र 1 ते 6 च्या परीक्षा दि. 6 नोव्हेंबर 2020 पासून सुरू होणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी दि. ११ सप्टेबर २०२० अथवा त्यापूर्वी परीक्षेचे अर्ज भरले आहेत, केवळ तेच विद्यार्थी ही परिक्षा देउ शकतील.
ऑनलाइन पद्धतीने या परीक्षा होणार आहेत. विद्यार्थ्यांनी www.pahsu.org. या पोर्टलवरून परीक्षा द्यावी. विद्यार्थ्यांचे लॉगिन तपशील त्यांच्या भ्रमणध्वनीवर आणि ई-मेलवर तसेच संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे पाठविले आहेत. जर मिळाले नसतील तर वरील पोर्टलवर जाऊन आपला PRN टाकून forgot password वर क्लिक करावे, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ऑनलाइन परीक्षा देताना अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी हेल्पलाईन क्रमांकाशी संपर्क साधून आपली समस्या दूर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेल्पलाईन क्रमांक
अभय- 8010093831, सौरभ- 8010076657, पवार- 8421478451, कोरे- 8421905623, लटके- 8421908436, गंगदे- 8421068436, मोटे- 8421238436, खंडागळे- 8421228432.